मुंबई : नेहमीपेक्षा यंदा उष्णतेच्या झळा लवकरच जाणवायला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेचा पारा 40 अंशांवर पोहोचला होता. त्यामुळे एप्रिल आणि जून दरम्यान तापमान किती वाढणार याची चिंता आता नागरिकांना सतावत आहे. त्यातच हवामान विभागाच्या अंदाजाने नागरिकांची चिंता आणखी वाढवली आहे.
महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये एप्रिल आणि जून दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एप्रिल महिन्याचा उष्णतेचा पारा अधिक राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या उष्णतेचा सामना करताना काळजी घेण्याची गरज आहे. एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पाऊस देखील चिंता वाढवू शकतो.
राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. यामुळे एप्रिलमध्ये 6 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचाही अंदाज आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हे पण वाचाच..
आता या एक्स्प्रेसला मिळाला भुसावळ स्थानकावर थांबणार
महिलांसाठी ही विशेष योजना 1 एप्रिल पासून झाली सुरु : नेमकी काय आणि कसा लाभ मिळेल?
खळबळजनक! तरुणीने बनवला आपल्याच मैत्रिणीचा बाथरूममधील आंघोळ करतानाचा व्हिडीओ, अन्…
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत बंपर भरती सुरु
कोणत्या राज्यात उष्णतेची लाट येणार
बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ़, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि हरियाणातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतातील काही भाग सोडला तर सर्वच ठिकाणी भीषण गर्मीचा सामना नागरिकांना करावा लागू शकतो.