जळगाव,(प्रतिनिधी)- रामनवमी निघालेल्या मिरवणूक दरम्यान जळगाव व भुसावळ येथे हिंदु-मुस्लिमजातीय सलोख्याचे दर्शन दि.३०.मार्च २०२३ रोजी दिसून आले.भुसावळ बाजारपेठ अंतर्गत श्रीरामनवमी निमित्त निघालेल्या मिरवणुकीत भुसावळ येथील जय श्रीराम ग्रुप तसेच विठ्ठल मंदिर राम मंदिर वार्ड ग्रुप या मंडळाच्या मिरवणुका जामा मशिदीजवळ आल्यानंतर मुस्लिम एकता मंचचे वतीने साबीर शेख रोशन, इकबाल इसा बागवान यांच्यासह मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीतील मंडळांचे अध्यक्ष श्री. पवन मेहरा व श्री. अमोल सोनार व त्यांचे सोबत असलेल्या कार्यकत्यांना पुष्पगुच्छ देवुन रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपुर उपविभाग अतिरिक्त कार्यभार भुसावळ विभाग, २)श्री राहुल गायकवाड पोलीस निरीक्षक भुसावळ बाजरपेठ पोलीस स्टेशन ३) श्री. गजानन पडघण पोलीस निरीक्षक भुसावळ शहर पोलीस स्टेशन तसेच बंदोबस्तामधील इतर पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनकडून सदर प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कुणाल सोनवणे यांचे हस्ते हिंदु-मुस्लिम बांधवांना “महाराष्ट्रातील समाजसुधारक” ही पुस्तके वाटण्यात आली.
जळगाव शहर….
दि.३० मार्च २०२३ रोजी जळगाव शहर व शनिपेठ पो.स्टे. अंतर्गत श्रीरामनवमी निमित्त निघालेली मिरवणुक ही जळगाव शहरातील जामा मशिद येथे आल्यानंतर जामा मशिदचे ट्रस्टी सैय्यद चांद सैय्यद आमीर तसेच माजी नगरसेवक खालिद बागवान, समाजवादी पार्टीचे रईस बागवान यांनी त्यांचे कार्यकर्त्यांसह हजर राहुन श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्री सचिन नारळे व मिरवणुकीत त्याचे सोबत असलेल्या हिंदु कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ देवुन रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.
सदर प्रसंगी जळगावचे आमदार श्री. राजुमामा भोळे, श्री. चंद्रकांत गवळी अपर पोलीस अधीक्षक श्री संदिप गावीत उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. विजयकुमार ठाकुरवाड, पोलीस निरीक्षक जळगाव शहर पोलीस स्टेशन श्री. लिलाधर कानडे पोलीस निरीक्षक शहर वाहतुक शाखा, श्री. शंकर शेळके, पोलीस निरीक्षक शनिपेठ पोलीस स्टेशन, श्री. बबन आव्हाड पोलीस निरीक्षक जिल्हापेठ पोलीस स्टेशन तसेच बंदोबस्तामधील इतर पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते.
#hindumuslim #india #hindu #muslim #hindumuslimunity #bjp #hindumuslimbhaibhai #hindumuslimlove #hindutva #hindustan #hinduism #hindumuslimekta #instagram #narendramodi #modi #amitshah #indianmuslim #hindurashtra #hindumuslimfriendship #indian