नाशिक : सोशल मीडियावर अनेकदा फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच सध्या सोशल मिडीयावर दोन तरुणींच्या फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तरुणी हाणामारी करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ नाशिकमधील आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल
या व्हिडीओत दोन शाळकरी मुली एकमेकींना लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. नाशिक (Nashik) रोड परिसरातील ही घटना आहे. भर रस्त्यात या दोन तरुणी एकमेकांना जोरदार मारहाण करत आहे. त्या एकमेकींचे केस ओढून मारहाण करताना दिसत आहेत. या मुलीचं दंगल बघायला अनेक लोकांनी गर्दी केली होती. याचवेळी कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ (Video Viral) तयार केला आणि व्हायरल केला.
दोन तरुणींच्या फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तरुणी हाणामारी करताना दिसून येत आहेत. pic.twitter.com/FIEqb9CNHy
— News18Lokmat (@News18lokmat) February 4, 2023
या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. मात्र या तरुणींमध्ये नेमका कोणत्या गोष्टीवरून वाद झाला होता याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दम्यान नाशिकला ही घटना काही नवीन नाही, यापूर्वी देखील अनेकदा शहरात असे प्रकार घडले आहेत.