पुणे : पुणे सांस्कृतिक शहर, शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते. परंतु गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या अत्याचारात घटना पुणे शहर व परिसरात वाढत आहे. अशातच लग्नाचं आमिष दाखवून राहत्या घरात खेळण्याच्या बहाण्याने तेरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 13 वर्षीय मुलगी गर्भवती असल्याचं लक्षात आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वानवडी परिसरात ही घटना घडली आहे.
पुणे येथील वानवाडी भागात १९ वर्षीय तरुण व १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी शेजारी शेजारी राहते. दोघांची अनेक वर्षांपासून मैत्री होती. मुलाने 13 वर्षीय मुलीला खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन गेला होता. त्यावेळी तिला प्रेम असल्याचं सांगितलं आणि लग्न करण्यासंदर्भात जबरदस्ती केली. त्यानंतर खेळण्याच्या बहाण्याने आरोपीने अनेकदा राहत्या घरी नेऊन तिचा लैंगिक छळ केला.
हा सगळा प्रकार किमान सहा महिने सुरु होता. काही दिवसांपूर्वी 13 वर्षीय मुलीच्या पोटात दुखायला लागलं. त्यावेळी आईने मुलीला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तिच्या सर्व तपासण्या करुन घेतल्या. यात धक्कादायक रिपोर्ट समोर आला.
हे पण वाचा..
मोठी बातमी ! एकनाथ खडसे ‘नॉट रिचेबल’, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
भारतात आर्थिक मंदी येणार, सरकारलाही भीती? केंद्रीय मंत्र्याचे धक्कादायक विधान
वाहनचालकाने ट्रक थेट शहरातील वर्दळी रस्त्यावर घातला अन्… जळगावातील घटना
मुलगी 28 आठवडे गर्भवती असल्याचं डॉक्टरांच्या रिपोर्टमधून समोर आलं. हे ऐकून आईला धक्का बसला आणि आईने मुलीकडे विचारणा करायला सुरुवात केली. त्यानंतर आईने थेट पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. त्यानंतर 19 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.