जळगाव : सर्व सामान्य कार्यकर्त्यांसाठी सदा सर्वकाळ फोनवर अगदी सहज उपलब्ध असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. याबाबतचे वृत्त टिव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे.
या वृत्तानुसार, गेल्या ८ दिवसांपासून एकनाथ खडसे नॉच रिचेबल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ खडसे यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क झालेला नसल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. नेहमी कायम मोबाईलद्वारे संपर्कात असणार्या नाथाभाऊंशी संपर्क होत नसल्याने समर्थक अस्वस्थ झाल्याचे या बातमीत म्हटले आहे.
हे पण वाचा..
भारतात आर्थिक मंदी येणार, सरकारलाही भीती? केंद्रीय मंत्र्याचे धक्कादायक विधान
वाहनचालकाने ट्रक थेट शहरातील वर्दळी रस्त्यावर घातला अन्… जळगावातील घटना
महाराष्ट्रासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे ; थंडीबाबत हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज
मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनतेला बसणार वीज बिल दरवाढीचा शॉक?
दोन्ही फोन नॉट रिचेबल
एकनाथ खडसे यांचा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कार्यकर्त्यांशी संपर्क झालेला नाही. असं पहिल्यांदाच घडल्याच घडतंय, अशीही माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांचे दोन्ही फोन नंबर्स नॉट रिचेबल असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काही महत्त्वाची घडामोड समोर येतेय का, याकडे सर्वांचं लक्ष लागंलय.