जळगाव ;- शहरातील गुजराथी गल्लीत राहणार्या तरुणाचा दारूच्या अतिसेवनामुळे आज शुक्रवारी मृत्यू झाल्याची घटना घडली. अमित चंद्रकांत वाणी (वय-32) असे या मृत तरुणाचे नाव असून याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमित वाणीला याला दारूचे व्यसन होते. गेल्या आठवड्यापासून अतिदारू पिल्याने आजारी होता. आज सकाळी 9 वाजता राहत्या घरी अत्यवस्थ वाटू लागले. त्याला उपचारार्थ जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. याबाबत जिल्हापेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय.