मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. सोळाव्या फेरीअखेर रूतुजा याना ५८ हजार ८७५ मते मिळाली आहेत. तर त्यांच्यानंतर सर्वाधीक ११ हजार ५६८ मते नोटाला मिळालेली आहेत. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित झाला असून फक्त औपचारिकता बाकी आहे. शिवसेना फुटींनंतरच्या या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे गटाने बाजी मारत आपली मशाल पेटवली आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर ही पहिलीच पोटनिवडणूक असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष्य या निवडणुकीकडे लागले होते. महाविकास आघाडीने ही पोटनिवडणूक एकत्रितपणे लढली होती. ऋतुजा लटके याना काँग्रेस – राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या विरोधात ७ उमेदवार उभे होते. मात्र या सर्व उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त मते पडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण काही दिवसांपूर्वीच लटके यांच्या विरोधात नोटांचं बटन दाबण्याचा प्रचार विरोधकांकडून सुरु आहे असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता.
हे देखील वाचा..
कपूर घराण्यात चिमुकल्या परीचं आगमन ; आलिया आणि रणबीरला कन्यारत्न
अती भयंकर ! मुलीला घरी सोडून येतो म्हणून घेऊन गेला, पण..
खाद्यतेलाच्या किमती पुन्हा वाढल्या ; काय आहे नवीन दर? वाचा..
भाजपने घेतली होती माघार
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे कारण देत भाजपने अखेरच्या दिवशी आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतला. मात्र या पोटनिवडणुकीत फक्त ३१.७४% मतदान झाल्याने ठाकरे गटाची धाकधूक वाढली होती. विरोधकांकडून लटके यांच्या विरोधात नोटांचं बटन दाबण्याचा प्रचार सुरु आहे असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. मात्र या सर्वांवर मात करत ऋतुजा लटके यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. लटके यांच्या विजयामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बळ मिळणार आहे.