भुसावळ : भुसावळ स्थानकावरून मुंबई नागपूर कडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे उद्या सोमवारी भादली रेल्वे स्थानकात चौथ्या लाइनचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामादरम्यान ७ व ८ नोव्हेंबरदरम्यान मुंबई, पुणे, नागपूरकडे जाणाऱ्या नऊ गाड्यांना रद्द करण्यात आले आहे. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना विविध स्थानकात थांबवण्यात येणार आहे.
या गाड्या रद्द
७ व ८ नोव्हेंबरदरम्यान मुंबई, पुणे, नागपूरकडे जाणाऱ्या नऊ गाड्यांना रद्द करण्यात आले आहे. यात (गाडी क्र. ११११३-१४) देवळाली-भुसावळ पॅसेंजर, (गाडी क्र.११९२०-२१) इगतपुरी-भुसावळ मेमू एक्स्प्रेस, (गाडी क्र. १९००५-६) भुसावळ-सुरत पॅसेंजर ७ व ८ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.
(गाडी क्र. १९००७-८) भुसावळ-सुरत पॅसेंजर, (गाडी क्र. ०९०७७-७८) भुसावळ-नंदुरबार एक्स्प्रेस, (गाडी क्र. १११२७-८) भुसावळ-कटनी पॅसेंजर, (गाडी क्र. १२११२-११) अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ही गाडी ७ व ८ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. (गाडी क्र. ११०२६-२५) पुणे-भुसावळ एक्स्प्रेस व (गाडी क्र. १२११४-१३) नागपूर-पुणे एक्स्प्रेस ही गाडी ८ व ९ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.
हे देखील वाचा..
अती भयंकर ! मुलीला घरी सोडून येतो म्हणून घेऊन गेला, पण..
खाद्यतेलाच्या किमती पुन्हा वाढल्या ; काय आहे नवीन दर? वाचा..
आजचे राशिभविष्य : या राशीच्या लोकांना आज आनंदाची बातमी मिळेल, जाणून घ्या तुमची राशी??
या गाड्यांचा खोळंबा
पुण्याकडे जाणाऱ्या हटिया एक्सप्रेसला भुसावळला थांबवण्यात येणार आहे. तर, मुंबईकडे जाणाऱ्या अमृतसर एक्स्प्रेस व गोरखपूर एक्सप्रेसला भुसावळला थांबण्यात येणार आहे. तर निझामुद्दीन एक्सप्रेसला जळगावी, गोरखपूर एक्सप्रेसला शिरसोनी तर नांदेड निझामुद्दीन एक्सप्रेसला म्हसावद स्थानकात थांबवण्यात येणार आहे.