गोंदिया : राज्यात महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसतेय. नराधमांना कायद्याचा धाकच राहिलेला नाहीय. अशातच आता एका मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक समोर आलीय.
३१ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला घरी सोडून देतो म्हणून आपल्या दुचाकीवर बसवून नेले. तर तरुणाने स्वतःच्या घरी आवश्यक काम असल्याच्या सांगत आपल्या घरी घेऊन गेला. व घरी कुणीही नसल्याच्या फायदा घेत तीच्यावर अत्याचार केला. इतकंच नव्हे तर त्याने घडलेला प्रकार कुणाला सांगू नये, अशीही धमकी दिली. ही घटना गोंदिया शहरात घडलीय.
दरम्यान, मुलीने झालेला प्रसंग आपल्या घरी आईला सांगितला, आईने तात्काळ गोंदिया ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. याबाबत ग्रामीण पोलिसांनी तक्रार दाखल करत आरोपी राजु डे (वय 31) असुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी विरुद्ध कलम ३७६/२, ३४२ पॉस्को ४/१२/८ गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असून दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत गोंदियात संताप व्यक्त करण्यात आला.