Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपचे १५ आमदार संपर्कात; मेगा नव्हे मेरिट भरती होणार- पाटील

najarkaid live by najarkaid live
November 17, 2019
in राज्य
0
भाजपचे १५ आमदार संपर्कात; मेगा नव्हे मेरिट भरती होणार- पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे – विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये गेलेले आमदार आणि अपक्ष आमदार असे एकूण १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा करतानाच आम्ही कोणतीही मेगा भरती करणार नाही, राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या आमदारांना मेरिटवरच पक्षात प्रवेश दिला जाईल, अस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांनी सांगितलं. पुण्यात राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला आले असता मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला. 

भाजपमध्ये गेलेल्या अनेक आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. अपक्ष आमदारही संपर्कात आहेत. त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करायचा आहे. आमचे आमदार आणि कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय आम्ही या आमदारांना प्रवेश देणार नाही. पक्षातील तरुण कार्यकर्त्यांचा हिरमोड होईल, असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असं सांगतानाच राष्ट्रवादीत येऊ इच्छिणाऱ्या आमदारांचं नाव उघड करून त्यांना अडचणीत आणून इच्छित नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

जनतेच्या मनातलं आणि स्थिर सरकार देण्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रयत्न आहे. थोडा वेळ जाईल, पण स्थिर आणि मजबूत सरकार लवकरच दिलं जाईल, असं ते म्हणाले. भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. ज्यांच्याविरोधात आम्ही लढलो. ज्यांना विचारानं पराभूत केलं. जे वैचारिकदृष्ट्या भिन्न आहेत. त्या भाजपसोबत आम्ही जाणार नाही, असं सांगतानाच भाजपपेक्षा शिवसेना म्हणजे दगडापेक्षा विट मऊ आहे, असंही ते म्हणाले.

आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत कोणत्याविषयावर चर्चा होणार हे मला माहित नाही. बैठकीला राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावण्यात आले आहे, असं सांगतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. मात्र हा मसुदा अंतिम नाही. तिन्ही पक्षाचे नेते दिल्लीत एकत्रित बैठक करून या मसुद्यावर अंतिम निर्णय घेतील, असं ते म्हणाले. सध्या तिन्ही पक्षाची चर्चा प्राथिमस्तरावर आहे. त्यामुळे घटक पक्षांना चर्चेसाठी बोलावलेलं नाही. जेव्हा विचाराची प्रक्रिया सुरू होईल, तेव्हा घटक पक्षांना बोलावलं जाईल, असंही ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

निधीवरून सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांचाच सभेत गोंधळ

Next Post

मुंबई पोलिसांचा स्वरतरंग कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची उपस्थिती

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
मुंबई पोलिसांचा स्वरतरंग कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची उपस्थिती

मुंबई पोलिसांचा स्वरतरंग कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची उपस्थिती

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us