रीवा: आजपासून देशभरात दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. यानिमित्त गावापासून दूर राहणारे अनेक कामगार आणि नोकरदार आता गावी परतू लागलेत. मात्र अशाच गावी परतणाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला भीषण अपघात झालाय. मध्य प्रदेशातील रीवाजवळ राष्ट्रीय महामार्ग-30 वर भीषण रस्ता अपघात झाला असून या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेवा पोलिसांनी दिली आहे. तर या अपघातात 40 जण जखमी झाले आहेत. काही प्रवाशांच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
शुक्रवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास रीवा परिसरातील पहाड घाटात हा अपघात झाला. हैदराबाद येथील सिकंदराबाद येथील प्रवाशांना घेऊन ही बस उत्तर प्रदेशच्या दिशेने निघाली होती. रीवा परिसरातील सोहागी घाट परिसरात हा अपघात झाला. एका माहितीनुसार, या बसमध्ये 100 पेक्षा जास्त प्रवासी होते.
हे सुद्धा वाचा..
धनत्रयोदशीच्या दिवशी काय आहे सोने-चांदीचा भाव ; येथे वाचा तुमच्या शहरातील दर
आज धनत्रयोदशीला ‘या’ तीन राशींचे नशीब चमकेल
राज्यात लवकरच 10 हजाराहून अधिक पदांसाठी मेगाभरती; मंत्री महाजनांची माहिती
दिवाळीत मुलीच्या भविष्यासाठी ‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक करा.. 21 वर्षांनंतर खात्यात येतील 65 लाख
रीवाचे एसपी नवनीत भसीन यांनी सांगितले की, बस हैदराबादहून गोरखपूरला जात होती. बसमधील सर्व लोक यूपीचे रहिवासी आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मध्य प्रदेशातील रीवा येथे झालेल्या रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त करताना, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी बोलून अपघातात जखमी झालेल्या लोकांवर योग्य उपचार करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50 हजार रुपये देण्याची सूचना केली आहे.