बीड : महाराष्ट्रमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी होत असताना बीडमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भाजपचे बीड शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरात स्वता: वर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. बियाणी यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भगीरथ बियाणी यांनी आपल्या राहत्या घरीच स्वतःला गोळी झाडत आत्महत्या केली. त्यांना लगेच शहरातील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु, तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं.
हे पण वाचा :
पक्ष चिन्हांबाबत शिंदे गटाचा मोठा निर्णय, निवडणूक आयोगाला पाठविले हे 3 पर्यायी चिन्ह
तुझे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करील… तुझ्या मुलाला मारुन टाकेल, धमकीनंतर महिलेवर…
..ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद ; नवीन चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका
या घटनेचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे. पण भागीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली याबद्दल अद्याप संभ्रम कायम आहे. दरम्यान, या घटनेमुळे भाजपमध्येही खळबळ उडाली असून खासदार प्रीतम मुंडे या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे.