पाचोरा : पाचोरा तालुक्यातून अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आलीय. तालुक्यातील एका गावातील तरुणाने विवाहितेचे आक्षेपार्ह फोटो काढून ते फोटो नवऱ्याला व सासू, सासऱ्यांना दाखवेल तसेच तुझ्या मुलाला मारुन टाकेल, अशी धमकी देऊन तरुणाने विवाहितेवर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. याबाबत नराधम तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २१ वर्षीय विवाहितेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुमारे दिड महिन्यापूर्वी पती, सासू-सासरे व दिर शेतात गेलेले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास विवाहिता घरी एकटी असल्याचे बघून आरोपी वैभव चौधरी हा घरात आला व त्याने तोंड दाबले. तू ओरडली तर विचार कर, अशी धमकी देऊन आरोपीने पिडीतेवर अत्याचार केला. त्यावेळी वैभवने त्याच्या मोबाईलमध्ये दोघांचे फोटो देखील काढले. यानंतर वैभव चौधरी याने पीडितेच्या व्हॉट्सअपवर मॅसेज करुन काढलेले फोटो पाठवले. हे फोटो तुझ्या नवऱ्याला व सासू, सासऱ्यांना दाखवेल तसेच तुझ्या मुलाला मारुन टाकेल, अशी धमकी देत पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केले.
हे पण वाचा :
..ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद ; नवीन चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका
सरकारच्या या योजनेंतर्गत खरेदी करा 100% अनुदानावर ड्रोन
रेस्टॉरंटमध्ये पती प्रेयसीसोबत, पत्नीला मिळाली खबर, नंतर काय झालं वाचा.. जळगावतला प्रकार
..आता दिवाळी तरी गोड करा; शेतकऱ्याच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ७ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पीडिता घरी एकटी असताना आरोपी वैभव हा पुन्हा एकदा पिडीतेच्या घरात घुसला. परंतू तेवढ्यात पीडितेचे सासू-सासरे व पती शेतातून घरी परत आले. पीडितेचा पती व सासरे यांनी वैभवला तू आमच्या घरात का आला? असे विचारले असता त्याने पिडीतेच्या पती व सासऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरडाओरड एकून वैभवचा चुलत भाऊ ऋषी चौधरी हा हातात लाकडी काठी घेऊन आला. त्यानेही पीडितेच्या पतीच्या डोक्यात काठी मारली. तसेच, सासू सासऱ्यांनादेखील चापटा बुक्कयांनी मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयितापैकी वैभवला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक अमोल पवार हे करीत आहेत.