मुंबई : शिवसेना आणि शिंदे गटामध्ये पक्षचिन्ह मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ सुरू आहे. काल केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालेलं आहे. मात्र अजूनही शिंदे गटाला पक्ष चिन्ह मिळाले नाहीय. त्यासाठी आज शिंदे गटाला नवीन तीन पर्याय देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. अखेरच्या क्षणी ईमेलद्वारे शिंदे गटाकडून 3 पर्यायी चिन्ह पाठवले आहे. शंख, रिक्षा, तुतारी फुंकणारा माणूस ही चिन्हं सादर केल्याची माहिती समोर आली आहे.
शिंदे गटाच्या याचिकेनंतर नुकतेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले होते. यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पर्यायी पक्षचिन्हांची यादी सादर करण्यात आली होती. यामध्ये त्रिशूळ, धगधगती मशाल आणि उगवता सूर्य या तीन चिन्हांचा समावेश होता.
हे पण वाचा :
तुझे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करील… तुझ्या मुलाला मारुन टाकेल, धमकीनंतर महिलेवर…
..ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद ; नवीन चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका
सरकारच्या या योजनेंतर्गत खरेदी करा 100% अनुदानावर ड्रोन
रेस्टॉरंटमध्ये पती प्रेयसीसोबत, पत्नीला मिळाली खबर, नंतर काय झालं वाचा.. जळगावतला प्रकार
अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव आणि ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले. तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. पण अजूनही पक्षचिन्ह मिळाले नाही. त्यामुळे आता शिंदे गटाला आजच निवडणूक आयोगाकडे पर्याय द्यावे लागणार आहे. अखेरच्या क्षणी ईमेलद्वारे शिंदे गटाकडून 3 पर्यायी चिन्ह पाठवले आहे. एका ईमेलमध्ये शंख, तुतारी आणि रिक्षा या चिन्हाचा समावेश आहे.