Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टाकळी सिकंदर च्या तरुणाचा पुळूज येथे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ; भीमसैनिक सामाजिक संघटनेने घेतली दखल

najarkaid live by najarkaid live
October 1, 2022
in क्राईम डायरी
0
सुनेने सासूबाईंची धारदार शस्राने चक्क ‘तीन बोटे’ छाटली…पतीच्याही कानशिलात लगावली ;कारण ऐकून व्हाल अचंबित…
ADVERTISEMENT
Spread the love

सोलापूर, (महेश गायकवाड)-पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील जवळपास पाच ते सहा जणांनी मिळून देवीच्या मंदिरात का गेला असे म्हणून कुऱ्हाडीने व कढीने आणि लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करून जखमी केल्यामुळे लक्ष्मण बसप्पा पुटगी हा टाकळी सिकंदर येथीलबौद्ध तरुण गंभीर जखमी झाला आहे या बाबत ची फिर्याद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

परंतु पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी किरकोळ कलम लावून आरोपींना मोकळे सोडले आहे, त्यामुळे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे फिर्यादी ने तक्रार दाखल केली आहे. ही घटना दिनांक 26 सप्टेंबर 22 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पुळूज येथील अंबिका देवी च्या मंदिरासमोर घडलीआहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी भिमसैनिक सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीकुमार नागटिळक यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिकंदर टाकळी येथील रहिवासी लक्ष्मण बसप्पा पुटगी, हे लहु रामचंद्र कांबळे, त्याचा भाचा अमोल उर्फ लाल्या अंकुशराव कांबळे, रामा कांबळे, पिंटू कांबळे व पिंटी कांबळे (सर्व राहणार पुळूज ता पंढरपूर) हे व इतर 15 जण असे सर्वजण मिळून दिनांक 25 सप्टेंबर 22 रोजी तुळजापूर येथे नवरात्र निमित्त देवीची ज्योत आणण्यासाठी गेले होते, ज्योत घेऊन हे सर्वजण दिनांक 26 सप्टेंबर 22 रोजी सकाळी 7 वाजता अंबिका मंदिर पुळूज येथे हे सर्वजण आले, यावेळी अमोल उर्फ लाल्या अंकुशराव कांबळे, लहु रामचंद्र कांबळे, या दोघांनी तसेच वरील नमुद लोकांनी मिळून आपणासोबत विनाकारण भांडण काढून डोक्यात कुऱ्हाडी ने मारले, लाथा बुक्यांनी मारून गंभीर जखमी केले, यामुळे माझ्या डोक्यात 22 टाके पडले उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मला वरील लोकांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने मारून गंभीर जखमी केले आहे अशी फिर्याद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 023 भांदं वि कलम 324, 323,504, व 34 प्रमाणे दाखल करण्यात आला असून यातील सर्व आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही हे सर्व आरोपी सद्या मोकाट आहेत.

माझ्यावर जीव घेणा हल्ला झाला असतांना पोलीसांनी आरोपींना वाचविण्यासाठी 307 हे कलम न लावता किरकोळ जामीनपात्र कलम लावले आहेत त्यामुळे वरील सर्व आरोपींवर 307 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि सर्व आरोपींना अटक करण्यात यावी अशी तक्रार फिर्यादी ने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘त्या’ तिघांनी ट्रान्सपोर्टचे भाडे थकविले, पैसे मागितले तर धक्काबुक्की केली ; त्रासाला कंटाळून व्यवसायिकाने आत्महत्या केली

Next Post

महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहिर ; जिल्हानिहाय संपूर्ण यादी वाचा

Related Posts

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मुंबईत जिजाजीकडून अल्पवयीन सालीवर वारंवार बलात्कार ; गर्भवती झाल्यावर बहिणीनेही लपवलं प्रकरण

August 4, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मैत्रीचा काळा दिवस! फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मैत्रिणीला  सिगारेटचे चटके, पोटात ठोसे मारले, धक्कादायक घटना

August 4, 2025
Breking news in jalgaon

Crime news : ‘तू मला आवडतेस’,वाहिनी सोबत दीराने केली अश्लील छेडछाड!

July 31, 2025
Next Post
अखेर पालकमंत्र्यांची नावं जाहीर ; संपूर्ण यादी वाचा

महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहिर ; जिल्हानिहाय संपूर्ण यादी वाचा

ताज्या बातम्या

Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

August 30, 2025
बाजारातील धोक्यापासून Mutual Funds बचावसाठी TREPS झाला नवा ‘सेफ झोन’

बाजारातील धोक्यापासून Mutual Funds बचावसाठी TREPS झाला नवा ‘सेफ झोन’

August 30, 2025
UPS Pension Scheme: केंद्र सरकारने केले महत्त्वाचे बदल ; कर्मचाऱ्यांसाठी नवीन फायदे

UPS Pension Scheme: केंद्र सरकारने केले महत्त्वाचे बदल ; कर्मचाऱ्यांसाठी नवीन फायदे

August 30, 2025
१ सप्टेंबरपासून Cashless सेवा धोक्यात! Bajaj Allianz चा मोठा निर्णय!

१ सप्टेंबरपासून Cashless सेवा धोक्यात! Bajaj Allianz चा मोठा निर्णय!

August 30, 2025
ब्रेकिंग : आझाद मैदानात आंदोलकाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

ब्रेकिंग : आझाद मैदानात आंदोलकाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

August 29, 2025
जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज झाले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय !

जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज झाले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय !

August 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us