Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सरदारशेठ राजपूत तर उपसभापती पदी किशोर भिकनराव पाटील यांची बिनविरोध निवड

najarkaid by najarkaid
November 13, 2019
in जळगाव
0
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सरदारशेठ राजपूत तर उपसभापती पदी किशोर भिकनराव पाटील यांची बिनविरोध निवड
ADVERTISEMENT

Spread the love

 येत्या आठवड्याभरात बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना 10 रुपयात जेवण देणारी  स्व.रामराव जिभाऊ अन्नपूर्णा योजना”

व माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांच्या नावाने कृषी वाचनालय सुरू करणार – आमदार मंगेशदादा चव्हाण

 चाळीसगाव – बाजार समितीमध्ये येणारा प्रत्येक शेतकरी आपले दैवत आहे, या दैवताची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली असून सद्यस्थितीत अडचणीत असलेल्या बळीराजाला आधार देणे गरजेचे आहे. पोटाला चिमटा देऊन शेतकरी मोठ्या अपेक्षेने बाजार समितीत येतो. त्यांच्या सोयीसाठी येत्या आठवड्याभरात सहकारमहर्षी स्व.रामराव जिभाऊ पाटील यांच्या नावाने अन्नपूर्णा योजना कार्यान्वित करण्यात येऊन नाममात्र 10 रुपयात शेतकऱ्यांना दर्जेदार असे पोटभर जेवण दिले जाईल तसेच उद्याच हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांच्या नावाने कृषी वाचनालय उद्घाटन करणार असल्याची घोषणा आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केली. ते चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीच्या प्रसंगी बोलत होते.

          चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीमध्ये भाजपा – सेना प्रणित सहकार पॅनलचे सरदारशेठ राजपूत यांची सभापती पदी तर उपसभापती पदी किशोर भिकनराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सदर निवडी साठी पुढाकार घेतला होता.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष के बी साळुंखे, बाजार समितीचे माजी सभापती रविंद्र आबा पाटील, माजी उपसभापती महेंद्रबापू पाटील, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष आनंद जी खरात, जेष्ठ संचालक मच्छिंद्रभाऊ राठोड, धर्मा बापू काळे, विश्वजित भैय्या खैरनार, शिरीष जगताप, सौ.अलकनंदा धर्मराज भवर, सौ.शोभाबाई आबा पाटील, आर.एल. नाना पाटील, बाळासाहेब वाबळे, तालुका सरचिटणीस प्रा.सुनील निकम, अनिल नागरे, शहर सरचिटणीस प्रशांत पालवे, अमोल नानकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, भाजपा तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, बंजारा सरपंच संघटनेचे साहेबराव राठोड, डॉ.महेंद्र राठोड, किशोर पाटील ढोमणेकर, प्रज्ञावंत आघाडीचे रमेश सोनवणे, अनुसूचित जमाती आघाडीचे स्वप्निल मोरे, नगरसेवक बापू अहिरे, सौ.विजयाताई प्रकाश पवार, माजी पं.स.सदस्य सतीश पाटे, माजी नगरसेवक अविनाश चौधरी, निलेश महाराज राजपूत, भटके आघाडीचे सुदाम चव्हाण, कार्यालयमंत्री अरुण पाटील, राजेंद्र पगार, कैलास पाटील,ज्ञानेश्वर पाटील, निवृत्ती कवडे, भैय्यासाहेब पाटील, जमादार पाटील यांच्यासह भाजपा – सेना पक्षाचे पदाधिकारी – कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

 आपल्या मनोगतात आमदार मंगेशदादा चव्हाण पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती ची धुरा सांभाळण्याचे पुण्याचे काम आपल्या हातून घडणार आहे, सर्व सन्माननीय संचालक मंडळाने समंजसपणे व अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेऊन एक आदर्श घालून दिला त्याबद्दल मी त्यांचेदेखील आभार मानतो. चाळीसगाव तालुक्याचे भाग्यविधाते स्व.रामराव जिभाऊ यांच्या कुशल अश्या नेतृत्वाखाली चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. त्यांच्या काळापासूनच जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील एक अग्रगण्य बाजार समिती म्हणून चाळीसगाव बाजार समितीची ओळख निर्माण झाली ती यापुढे देखील कायम ठेवण्याची जबाबदारी आपली आहे.

ऑगस्ट २०१५ मध्ये मार्केट कमिटीची निवडणूक होऊन भाजपा – सेना प्रणित सहकार पॅनल ला भरघोस मतांनी  विजयी केले. मार्केट कमिटीचे सभापती रविआबा व  उपसभापती महेंद्रबापू  व सर्व संचालक मंडळाच्या प्रयत्नाने कांदा मार्केट सुरु करण्याचा ऐतिहासिक निर्णय या काळात घेतला गेला. २०१५ मध्ये १२ लाख शिल्लक असलेली बाजार समिती आज 1 कोटी शिल्लक मध्ये आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे अडकलेले ७५ लाख रुपये मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन.

२०१५ च्या बाजार समिती निवडणूक प्रक्रियेत मी सुद्धा सक्रियपणे सहभागी होतो. माझे वडील रमेश गोविंदा चव्हाण हेदेखील सहकार पॅनलकडून उमेदवार होते. मात्र अल्पश्या फरकाने ते पराभूत जरी झाले असले तरी मला सर्वाधिक आनंद हा आपले पॅनल निवडून येत सत्ता स्थापन झाल्याचा होता. मात्र वडिलांची पुण्याई आणि आपल्या सर्वांचे आशिर्वाद यामुळे आज त्याच पॅनलच्या नूतन सभापती – उपसभापती यांचे अभिनंदन करण्याचे भाग्य मला आमदार या नात्याने मिळाले असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; सरन्यायाधीशांचं कार्यालय आरटीआय कक्षेत

Next Post

नवजीवनतर्फे बालदिनानिमित्त अभूतपूर्व ऑफर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
नवजीवनतर्फे बालदिनानिमित्त अभूतपूर्व ऑफर

नवजीवनतर्फे बालदिनानिमित्त अभूतपूर्व ऑफर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us