मुंबई : काही दिवसांची उघडीप मिळाल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा राज्यात थैमान घालायला सुरूवात केली आहे. राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून आजपासून पावसाची तीव्रता आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढचे 4 ते 5 दिवस राज्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसांची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. जळगाव जिल्ह्यातही पुढील तीन दिवस पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईसह रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. येत्या ४-५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहान हवामान विभागाने केलं आहे.
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता:
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर आजपासून राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे.
आज म्हणजेच 12 सप्टेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना, तर 13 सप्टेंबरला रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 14 सप्टेंबर रोजी पुणे आणि मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, या तिन्ही दिवशी मुंबईत येलो अलर्ट देण्यात आला आहे. 12 सप्टेंबरपासून मुंबई, ठाण्यासह कोकण भागात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे.
हे पण वाचा..
कामगारांसाठी महत्वाची बातमी ; ‘या’ योजनेतून 2 लाख रुपये मिळणार, घरी बसून असा करा अर्ज?
नोकरीची मोठी संधी… मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि.मध्ये मेगाभरती
मोठी बातमी : मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार? मनसेची आज बैठक
या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराचे उत्तरेकडील भागावर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालं आहे. कोकण, मराठवाडा आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातून नैऋत्येकडून तर विदर्भात आग्नेयेकडून वाऱ्याची दिशा आहे. मान्सूनची नैऋत्येकडील आणि बंगालच्या उपसागराकडील शाखा सक्रिय झाली आहे. नैऋत्य मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. परिणामी या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल.
दरम्यान, जळगाव जिल्ह्याला १४ सप्टेंबरपर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.