Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेला १७० आमदारांचा पाठिंबा; राऊत यांचा दावा

najarkaid by najarkaid
November 3, 2019
in राज्य, राजकारण
0
शिवसेनेला १७० आमदारांचा पाठिंबा; राऊत यांचा दावा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- राज्यात सत्तास्थापनेच्या दिशेने आता घडामोडींना वेग आला आहे. खासदार राऊत यांनी रविवारी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल आणि त्याचा शपथविधी शिवतीर्थावर होईल असं राऊत पत्रकार परिषदेत ठामपणे म्हणाले. हा विश्वास त्यांनी १७० आमदारांच्या पाठिंब्यावर व्यक्त केला आहे. शिवसेनेला १७० आमदारांचं पाठबळ आहे आणि ही संख्या १७५ पर्यंत देखील जाऊ शकते असा राऊतांचा दावा आहे.
राष्ट्रवादी (५४), काँग्रेस (४४) व इतरांच्या मदतीने बहुमताचा आकडा १७० पर्यंत जाईल, असा विश्वास राऊत यांना आहे. या आकडेवारीसंदर्भात आणि सत्तास्थापनेच्या संभाव्य पर्यायांबाबत त्यांनी रोखठोकमध्येही लिहिलं आहे.

राऊत लिहितात त्याप्रमाणे हे आहेत पर्याय –
पर्याय १ – शिवसेनेस वगळून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेचा दावा करू शकते. भाजपकडे १०५ आमदार आहेत. ४० जास्त लागतील. ते शक्य झाले नाही तर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांचे सरकार कोसळेल. ४० जास्त मिळवणे हे अशक्यच दिसते.
पर्याय २ – २०१४ प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षास पाठिंबा देईल. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होईल. त्या बदल्यात सुप्रिया सुळे यांना केंद्रात व अजित पवारांना राज्यात पद दिले जाईल. पण २०१४ साली केलेली ही घोडचूक पवार पुन्हा करतील याची सुतराम शक्यता नाही. पवारांना भाजपविरोधात यश मिळाले आहे व महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतले आहे. आज ते शिखरावर आहेत. त्यांच्या यशाची माती होईल.
पर्याय ३ – भाजप विश्वासदर्शक ठरावात अपयशी ठरल्यावर दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेना सरकार स्थापनेचा दावा करू शकेल. राष्ट्रवादी (५४), काँग्रेस (४४) व इतरांच्या मदतीने बहुमताचा आकडा १७० पर्यंत जाईल. शिवसेना स्वतःचा मुख्यमंत्री करू शकेल व सरकार चालवण्याचे साहस त्यांना करावे लागेल. त्यासाठी तीन स्वतंत्र विचारांच्या पक्षांना समान किमान सामंजस्याचा कार्यक्रम तयार करून पुढे जावे लागेल. अटलबिहारी वाजपेयींनी जसे सरकार दिल्लीत चालवले तसे सगळय़ांना धरून पुढे जावे लागेल. त्यात महाराष्ट्राचे हित आहे.
पर्याय ४ – भारतीय जनता पक्ष व शिवसेनेस नाइलाजास्तव एकत्र येऊन सरकार स्थापन करावे लागेल. त्यासाठी दोघांनाही चार पावले मागे यावे लागेल, शिवसेनेच्या मागण्यांवर विचार करावा लागेल, मुख्यमंत्रीपदाची विभागणी करावी लागेल व हाच एक उत्तम पर्याय आहे; पण अहंकारामुळे ते शक्य नाही.
पर्याय ५ – ईडी, पोलीस, पैसा, धाक यांचा वापर करून इतर पक्षांचे आमदार फोडून भाजपास सरकार बनवावे लागेल (त्यासाठी ‘ईडी’चा एक प्रतिनिधी मंत्रिमंडळात सामील करावा लागेल), पण ‘पक्षांतर’ करणाऱ्यांची काय अवस्था झाली हे मतदारांनी दाखवून दिल्याने फाटाफूट घडवून बहुमत मिळवणे, मुख्यमंत्रीपद मिळवणे सोपे नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेना सत्तेत येईल की नाही हे कळेलचः उद्धव ठाकरे

Next Post

मुख्यमंत्र्यांना जनतेनं ट्रोल केलंयः छगन भुजबळ

Related Posts

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Next Post
मुख्यमंत्र्यांना जनतेनं ट्रोल केलंयः छगन भुजबळ

मुख्यमंत्र्यांना जनतेनं ट्रोल केलंयः छगन भुजबळ

ताज्या बातम्या

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता 'या' विभागात 3 हजार पदांची भरती

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता ‘या’ विभागात 3 हजार पदांची भरती

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us