Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काळीज हेलावून टाकणारी घटना ; 7 वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन बलात्कार आणि हत्या!

Editorial Team by Editorial Team
August 6, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत.अशातच काळीज हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. इतकंच नाही बलात्कारानंतर या सात वर्षांच्या मुलीची हत्यादेखील करण्यात आली.ही घटना पुण्यातील मावळ तालुक्यात घडली असून या घटनेनं संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी या घटनेबाबातची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटकही करण्यात आलीय. या नराधमाची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे. 10 ऑगस्टपर्यंत या नराधमाला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. मंगळवारी एक सात वर्षांची चिमुरडी बेपत्ता झाली होती. घरातूनच या मुलीचं अपहरण करण्यात आलेलं होतं. या मुलीचा शोध घेतला जात असतानाच आता समोर आलेल्या खळबळजनक घटनेनं सगळ्यांचा मोठा धक्का बसलाय.

नराधमाला अटक

अपहरण, बलात्कार आणि हत्या अशा तीन गुन्ह्यांखाली 24 वर्षांच्या तेजस दळवी नावाच्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. कामशेत पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. सात वर्षांच्या चिमुरडीचं तेजसने तिच्या घरातूनच अपहरण केलं होतं. घरातून या चिमुरडीला पळवून नेल्यावर तेजसने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिचा खूनही केला. मंगळवारपासून ही चिमुरडी बेपत्ता होती. तिचा मृतदेह हाती लागल्यानंतर पोलिसांनी तो पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला होता. त्यानंतर पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा करण्यात आला.

सात वर्षांच्या चिमुरडीची हत्या करण्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता, याचा खुलासा पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमधून झाला. त्यानंतर पोलिसांनी हत्येसोबत बलात्काराचाही गुन्हा नोंदवून घेतला आहे. यानंतर पोलिसांनी लगेचच नराधम आरोपीविरोधात अटकेची कारवाई केली. आरोपी तेजस दळवी याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 10 ऑगस्टपर्यंत तेजस दळवीला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. सध्या कामशेत पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत असून नराधमाची कसून चौकशी पोलिसांकडून केली जातेय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्वातंत्र्य दिनापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडून मागितले ‘हे’ ‘गिफ्ट’, काय शक्य होईल?

Next Post

खळबळजनक ! धुळ्यात गोळीबार करत तरुणाचा खून

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
खळबळजनक ! धुळ्यात गोळीबार करत तरुणाचा खून

खळबळजनक ! धुळ्यात गोळीबार करत तरुणाचा खून

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us