Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहिणी ताईच भावी आमदार ! – रिपाइ तालुकाध्यक्ष विक्रम हिरोळे यांचा विश्‍वास

najarkaid by najarkaid
October 16, 2019
in जळगाव
0
रोहिणी ताईच भावी आमदार ! – रिपाइ तालुकाध्यक्ष विक्रम हिरोळे यांचा विश्‍वास
ADVERTISEMENT

Spread the love

  • रुईखेडा – चांगदेव गटात रोहिणीताई खडसे यांच्या प्रचार दौर्‍याला उदंड प्रतिसाद

मुक्‍ताईनगर – आ.एकनाथराव खडसे यांनी मतदार संघातील प्रत्येक गावा – गावात बौद्ध विहार तर दिलेच शिवाय दलित वस्ती अंतर्गत रस्त्यासह मूलभूत सुविधा पुरवल्या आहेत. गेल्या तीस वर्षात सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे सर्वमान्य, लोकमान्य असे नेतृत्व नाथाभाऊ चे आहे. गेल्या तीस वर्षात मतदार संघात कुठेही जातीय दंगली नाहीत, की दोन समाजात कुठेही तेढ नाही, असेच सामाजिक ऐक्य यापुढे ही कायम ठेवण्यासाठी भाजपा सेना महायुती च्या उमेदवार अ‍ॅड. सौ रोहिणीताई यांच्या पाठीशी संपूर्ण समाज भक्कम पणे उभा आहे. येत्या 21रोजी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून नाथाभाऊचे हात बळकट करण्यासाठी रोहिणीताईंना प्रचंड मतांनी विजयी करावे, रोहिणीताईच भावी आमदार असतील, अशी खात्री रिपाई चे तालुकाध्यक्ष विक्रम हिरोळे यांनी दिली. 
सौ रोहिणीताई खडसे यांच्या रुईखेडा -चांगदेव जि प गटात आयोजित प्रचार दौऱ्याप्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रोहिणीताई या कार्यक्षम असून त्यांनी गेल्या 3/4वर्षात त्यांची प्रशासनावरील, सहकारा वरील पकड घट्ट असल्याचे त्यांच्या नेतृत्व शैली ने सिद्ध करून दाखवले आहे. जिल्हा बँकेला सोनेरी दिवस आणण्यात सौ रोहिणीताईंची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. याशिवाय सूत गिरणी  व साखर कारखान्याच्या माध्यमातून हजाराहुन अधिक बेरोजगाराना रोजगार दिला आहे. निश्चितच ताई भविष्यात मतदार संघात विकास गंगा आणून चेहरा मोहरा बदलवतील यात शंका नाही, म्हणूनच भावी आमदार म्हणून सौ रोहिणीताई यांनाच प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन श्री हिरोळे यांनी केले.
यावेळी रोहिणीताईंनी मतदार महिला पुरुषांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, विकासकामे करताना नाथाभाऊंनी आपला परका असा भेद मानला नाही. संपूर्ण मतदारसंघातील गावांच्या विकासाचा दृष्टीकोन ठेवून त्याप्रमाणेच कार्य केले. आज मला मत म्हणजेच नाथाभाऊंना मत दिल्यासारखे आहे. 21 तारखेला मला आपला आशिर्वाद द्या. यावेळी ठिकठिकाणी महिलांनी रोहिणीताईंचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्यात.
प्रचार दौऱ्यात मानेगाव, चांगदेव, चिंचोल, मेहुण, कासारखेडा, वढवा, सारोळा, माळेगाव, हरताळा,कुंड, घोडसगाव, चिखली, सातोड, रुईखेडा, पिंप्रि आकराऊत या गावात जाऊन प्रचार केला. यावेळी  भाजप जिल्हा उपाध्यक्ष विलासभाऊ धायडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेशभाऊ  ढोले, भाजप तालुकाध्यक्ष दशरथभाऊ कांडेलकर,प स सभापती प्रल्हादभाऊ जंगले,रासप चे जिल्हाध्यक्ष रविभाऊ पवार,जि प सदस्य निलेश पाटील, प. स. सदस्या सुवर्णाताई साळुंखे, विकास पाटील,गट प्रमुख सुनिल भाऊ काटे, चंद्रकांतभाऊ भोलाने, समाधान कार्ले, विजय भंगाळे, युवा मोर्चा अध्यक्ष अंकुश चौधरी, सुभाष खाटिक,राजेंद्र कांडेलकर,राजेंद्र पाटील, कैलास कोळी,रामभाऊ पाटील, कैलास पाटील, उसामा रउफ खान, दीपक साळुंखे, भास्कर लवांडे, भारत घोळके, कैलास डहाके, अश्विन घोगरे ,प्रवीण डहाके, रवींद्र बेलदार, दिनकर सुरवाडे,विनोद काटे, प्रकाश साळुंखे, प्रवीण शिर्के, मांगो पाटील, अनिल काटे, रतन कोळी रघुनाथ चौधरी, मोहन चौधरी, राजू चौधरी, जिवराम चौधरी, भास्कर इंगळे, रामदास इंगळे, अजय सुरळके, मुकेश डीवर, विश्वनाथ सूर्यवंशी रउफ खान, राजकुमार डीवर,विकास पाटील, कैलास डीवर, लीलाधर माळी अशोक पाटील, आक्रोश भिल, जनार्धन निकम, भिका गोपाळ, पवन पाटील , दीपक साळुंखे,बाळाभाऊ सोनवणे,शेषराव पाटील,नंदू भाऊ हिरोळे,निलेश खोसे, युनुस पिंजारी, सुभाष माळी, शंकर माळी, प्रल्हाद पाटील, उमेश पाटील, गोविंद गवळी, राजू परसोडे,अतुल बढे, चंद्रशेखर बढे, प्रेमचंद बढे, वासुदेव बढे, विलास नारखेडे, हबीब वंजारी आदिंसह भाजपा, शिवसेना, रिपाई, शिवसंग्राम, रासप, रयतक्रांती महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहराच्या विकासासाठी मी वचनबद्ध  – अभिषेक पाटील 

Next Post

आ.राजुमामा भोळेंवर प्रचारात जनतेकडून पुष्पवृष्टी !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Next Post
आ.राजुमामा भोळेंवर प्रचारात जनतेकडून पुष्पवृष्टी !

आ.राजुमामा भोळेंवर प्रचारात जनतेकडून पुष्पवृष्टी !

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us