मुंबई: राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. यात सगळ्यांचे सहाव्या जागेवर लक्ष लागून होते. दरम्यान या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. तर शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभव पत्करावा लागला.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी जोरदार लढत सुरू होती.यात भाजपने धनंजय महाडिकांच्या रुपाने सहावा उमेदवार रिंगणात उतरवल्याची खेळी यशस्वी झाली असून त्यांच्या विजयाने महाविकास आघाडी, खासकरून शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिकांना महाविकास आघाडीचे काही मतं मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवला आहे.
दरम्यान, भाजपच्या धनंजय महाडिकांचा हा विजय आणि शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव हा महाविकास आघाडीच्या, खासकरून शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा आहे. सहाव्या जागेसाठी मतदान करताना महाविकास आघाडीची सहा मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे.