- राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटलांचा विविध प्रभागात प्रचाराचा धडाका

जळगाव : शहरातील तरूणांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, त्याला परीक्षांची तयारी करता यावी यासाठी आपण जळगाव शहरातील प्रत्येक प्रभागात स्पर्धा परीक्षा केंद्र तसेच करिअर कॉउन्सलिंग सेंटर मोफत उभारणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी दिले.
जळगाव शहरातील आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी आज शहरातील विविध प्रभागात प्रचार रॅली काढून मतदारांशी संवाद साधला. ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करण्यात आले.यावेळी त्यांनी तरूणांशी सवांद साधत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व करिअर कौन्सीलींगची सुविधा मोफत पुरविण्याबाबत आश्वासीत केले. प्रचारात त्यांना प्रत्येक प्रभागात प्रतिसाद मिळत असून तरूणांना युवा उमेदवार मिळाल्याने त्यांचादेखील पाठिंबा मिळत आहे.
यावेळी त्यांनी संवाद साधतांना शहरात इंडस्ट्रीज हबला चालना देणार असून रोजगार निर्मितीसाठी तसेच युवा उद्योजक निर्मितीसाठी स्वतंत्र उद्योग प्रबोधिनी उभारण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगत युवकांच्या क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी प्रत्येक वर्षी क्रीडा महोत्सव साजरा करणार असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक प्रभागात अभ्यासिका सुरू करण्यावर आपला भर राहणार असून मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यावरदेखील आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याचे स्पष्ट केले.















