
पाचोरा – पाचोरा -भडगाव मतदार संघांचे राष्ट्रवादी, काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार दिलीप वाघ यांनी प्रचार आघाडी घेतली आहे.
मतदार संघातील शहरा लगत जारगाव ग्रामीण सह अक्सा नगर, बिस्मिल्ला नगर, नुरानी नगर, परिसरात प्रचार करण्यात आला.यावेळी रज्जू बागवान, रशिद दादा, अकील शेक, यांच्यासह असंख्य कार्यकता प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या वेळी मतदारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वाघ यांचे स्वागत करत निवडुण देण्याचा संकल्प केला व भगीनी यांनी दिलीप वाघ यांचे औक्षण करत विजयाचा निर्धार पक्का केला.या वेळी प्रचार रॅली मध्ये नगरसेवक बशिर बागवान, रज्जु बागवान मा ग्रामपंचायत सदस्य, मोहंमद मिस्त्री, सचिन पाटील, अकिल शेक, किशोर डोंगरे, हिरामण भोसले, ईबु मिस्तरी, सतिष देशमुख, अज्जु बागवान, ओजीत बागवान सह असंख्य कायॅकते उपस्थित होते.