नागपूर : सध्या लिव्ह इन मध्ये राहण्याचेही प्रकार वाढत चालले असून अशातच एका लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यात भांडण झाल्यानंतर एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
मागील काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या प्रेयसीने एका कारणावरून आत्महत्या केली. प्रियकराला ही बाब कळताच त्यानेदेखील आत्महत्येचे पाऊल उचलले. संजय शालिकराम गजभिये (वय 45, रा. छत्रपतीनगर, कामठी) असे मृत प्रियकर तर कविता वानखेडे (वय 35) असे मृत प्रेयसीचे नाव आहे. हे दोन्ही जण मागील काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
सजंयची पत्नी माधुरी हिचे निधन झाले होते. यानतंर त्याचे कवितासोबत सूत जुळले होते आणि तो कवितासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्याला पहिली पत्नी माधुरीपासून 18 वर्षाची साक्षी आणि 17 वर्षाचा वैभव, अशी दोन मुले आहेत. तर कविताचे लग्न हे मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथील दिलीप वानखेडे नावाच्या व्यक्तीसोबत झाले होते. मात्र, दिलीपचे अपघाती निधन झाले. यानंतर ती संजय सोबत राहत होती.
मंगळवारी 24 तारखेला हे दोन्ही जण भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे नातेवाईकांकडे लग्नाला गेले होते. मात्र, यावेळी दोघांमध्ये एका कारणावरुन जोरदार भांडण झाले. प्रियकर संजय याने त्याची प्रेयसी कविताला मारहाणही केली. यामुळे ती आपल्या माहेरी काटोल येथे गेली. तर दुसरीकडे संजय हा कामठीला परत आला. मात्र, तिकडे काटोल येथे एक धक्कादायक घटना घडली. संजय याची प्रेयसी कविता हिने बुधवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास विषारी पावडर खाल्ली.