सिंधुदुर्ग : मालवणच्या तारकर्लीमध्ये मोठी दुर्घटना घडलेली आहे. 20 पर्यटकांनी भरलेली बोट तारकर्ली समुद्रात बुडाल्यानं खळबळ उडाली. त्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची मिळतेय.
बोट बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीन बचावकार्य करण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे 16 जणांचा जीव वाचवण्यात यंत्रणांना यश आलंय. बुडालेल्या बोटीचं नाव जय गजानन असल्याची माहिती समोर आली आहे.
कशामुळे बोट बुडाली?
मंगळवारी दुपारच्या सुमारात ही दुर्घटना घडली. त्यामुळे तारकर्लीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना मोठा धक्का बसलाय. स्कुबा डायव्हिंग करुन परतत असताना हा अपघात झाला. या अपघातातील सर्व पर्यटक हे पुणे आणि मुंबई येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, बोट नेमकी कोणत्या कारणामुळे बुडाली, याची माहिती मिळू शकलेली नाही.
हे पण वाचा :
मान्सूनचा भारतात आगमनाचा मुहूर्त हुकणार? काय आहे कारण वाचा..
कॉलेजच्या मुलींचा डान्स व्हिडीओ झाला तुफान व्हायरस, Video नक्की बघा
खळबळजनक ! प्रेयसीसोबत संभोग करताना प्रियकराचा मृत्यू
आनंदाची बातमी ! खाद्यतेलाच्या किमतीत घसरण, जाणून घ्या या मागील कारणे
स्कुबा डायव्हिंगसाठी येणारे धास्तावले!
उन्हाळ्याची सुट्टी असल्याकारणाने मोठ्या संख्येनं पर्यटक हे मालवणमध्ये फिरायला येत असतात. समुद्री खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या तारकर्ली अनेक पर्यटक हे स्कुबा डायव्हिंगसाठी येतात. स्कुबा डायव्हिंगचं प्रमुख आकर्षण असलेल्या मालवणला गेल्या काही काळापासून तारकर्लीत पहिली पसंती मिळतेय. मोठ्या संख्येनं येणाऱ्या पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगचा आनंद देणाऱ्या तारकर्लीत घडलेल्या घटनेनं गालबोट लागलंय.