भुसावळ : भुसावळहून मित्रांसोबत बुलेट बाईकने प्रवास करत गोव्याला फिरायला गेलेल्या 25 वर्षीय तरुणाचा दुःखद अंत झाला. समुद्राच्या लाटेसोबत वाहून गेल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. विवेक सुरेश मुराई असं मयत तरुणाचं नाव आहे.
मित्रांसोबत गोव्याला फिरायला गेला असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. विवेक सुरेश मुराई हा रेल्वेच्या सिनिअर सेक्शन विभागात इंजिनिअर होता. गोव्याला सर्व मित्र फिरायला गेले होते. गोव्याला पोहोचल्यानंतर आईशी फोनवर बोललाही होता.
समुद्राच्या लाटेसोबत वाहून गेला
विचारपूस करून तो मित्रांसोबत पोहण्यासाठी समुद्रात उतरला, मात्र समुद्राच्या लाटेसोबत वाहून गेल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भुसावळ शहरातील गडकरी नगर भागात शोककळा पसरली आहे.