जळगाव । अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नाहीय. अशातच जळगाव तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून ती गर्भवती राहिली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका काय आहे प्रकार?
याबाबत असे की, तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. १५ नोव्हेबर ते १० नोव्हेबर २०२१ दरम्यान अल्पवयीन मुलाने पीडीत मुलीशी जवळीक साधुन दोन वेळा अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलगी गर्भवती राहीली. मंगळवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी पडित मुलीच्या पोटात दुखायला लागले तेव्हा तिच्या पालकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आणले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
हे देखील वाचा :
मोठी बातमी ! अखेर मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक
VIDEO | मित्रांचा आग्रह नडला, नवरदेवाचा तलवारींसोबत डान्स, पोलीस येताच नवरदेव झाला फरार
रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी खुशखबर! सरकारने केली मोठी घोषणा, तात्काळ लाभ घ्या
स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करताय? Flipkart वर या टीव्हीवर मिळतेय मोठी सूट
अनेक वेब सीरिजमध्ये ‘या’ अभिनेत्रीने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, पहा फोटो
पीडीत मुलीला नातेवाईकांनी विश्वासात घेवून विचारपूस केली असता आपल्यावर मुलाचे नाव सांगून त्याने दोन वेळा अत्याचार केल्याचे सांगितले. पीडीत मुलीच्या नातेईकांना पिडीतेसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून रात्री ९ वाजता तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.