नवी दिल्ली, – दुचाकी वाहन धारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे, यापुढेही बाईक वरून चार वर्षा पेक्षा लहान मुलांना घेऊन जायचं असेल तर तुम्हाला केंद्र शासनाने नव्याने अंमलात आणलेला नवा नियम पाळावा लागणार आहे. हा नियम लागू करण्यासाठी केंद्र शासनाने एक अधिसूचना जारी केली आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेच्या माध्यमातून सीएमव्हीहीआर, 1989 च्या नियम 138 मध्ये सुधारणा केली असून त्यानुसार चार वर्षांखालील मुलांना घेऊन दुचाकीवर मागे बसवून नेणे किंवा त्यांना दुचाकीवरून नेण्यासाठी केलेल्या सुरक्षा उपाययोजनांशी संबंधित नियम निर्धारित केले आहेत.
मोटार वाहन कायद्याच्या कलम 129 अंतर्गत हे नियम अधिसूचित करण्यात आले आहेत , ज्यामध्ये केंद्र सरकार नियमांनुसार, चार वर्षांखालील मुलांना दुचाकीवर मागे बसवून नेणे किंवा त्यांना दुचाकीवरून नेण्यासाठी मुलांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना करू शकते.या नियमांमध्ये सुरक्षा सामग्री आणि मजबूत हेल्मेटचा वापर त्याचप्रमाणे अशा दुचाकीचा वेग 40 किमी प्रतितास पर्यंत मर्यादित असावा हे नमूद करण्यात आले आहे.केंद्रीय मोटार वाहन (दुसरी दुरुस्ती) नियम, 2022 प्रसिद्ध झाल्यापासून एका वर्षानंतर हे नियम लागू होतील.
अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा…