मुंबई : येत्या काही दिवसांत भाजपमधीलच ‘साडेतीन’ लोकं हे अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील आणि देशमुख हे बाहेर असतील, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे आता भाजपमधील ‘ती’ साडेतीन लोकं कोण?, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
दरम्यान, आज संजय राऊतच या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊ-दहाच्या सुमारास नाही, तर दुपारी साडे वाजता शिवसेना भवनात खास पत्रकार परिषद घेत राऊत बॉम्ब फोडणार आहेत. “यावेळी शिवसेना बोलणार नसून महाराष्ट्र बोलणार आहे. किरीट सोमय्या यांचे आरोप, ईडीच्या कारवाईवर पत्रकार परिषद घेणार आहे. महाराष्ट्र खोटारडेपणाविरोधात लढेल. ही पत्रकार परिषद विरोधकांनी ऐकावी, केंद्रीय तपास यंत्रणांनीही ऐकावी” असं आव्हानही राऊतांनी दिलंय.
संजय राऊतांनी म्हटलं की, भाजपचे साडे तीन लोकं हे त्याच (अनिल देशमुखांच्या) कोठडीत असतील. महाराष्ट्रात देखील सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचं ते करा आता मी घाबरणार नाही, असं राऊतांनी म्हटलं होतं.
संजय राऊत काय म्हणाले होते?
आम्ही खूप सहन केलं आम्ही, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. तिथं संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील. मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरं मिळतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राऊतांनी म्हटलं की, भाजपचे साडे तीन लोकं हे त्याच (अनिल देशमुखांच्या) कोठडीत असतील. महाराष्ट्रात देखील सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचं ते करा आता मी घाबरणार नाही, असं राऊतांनी म्हटलं आहे.















