मॉडेल उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट व्हिडिओमुळे चांगलीच चर्चेत आली असून तिच्या या व्हिडीओला सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम प्लॅटफार्मवर खूप लाईक मिळत आहे. चार दिवसापूर्वी उर्फी जावेद हिने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती टी-शर्ट घालून तिचे लांब पोनीटेल फिरवत आहे. तर काही सेकंदात तिचा टी-शर्ट ब्रॅलेट आणि शॉर्ट स्कर्टमध्ये बदलतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच लाईक होतांना दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/CZgTgPgBELq/?utm_source=ig_web_copy_link
उर्फी जावेद नेहमीच असते चर्चेत…
सोशल मीडियाची हॉट आणि सिझलिंग क्वीन उर्फी जावेद तिच्या हॉट लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या विचित्र ड्रेसेजमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते. पुन्हा एकदा, उर्फीची नवी शैली तिच्या चाहत्यांना आवडू लागली आहे. कारण यावेळी ती अतिशय शॉर्ट टॉपमध्ये ग्लॅमरस लूक देत आहे.
काय आहे व्हिडीओ मध्ये….
या व्हिडिओमध्ये उर्फीची लांब जाड वेणी आणि कपाळावर लटकणाऱ्या वेण्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उर्फी गेल्या वर्षी बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली होती. या शोपासून ती सतत सोशल मीडियावर राज्य करत आहे. कधी लोकांनी तिला ट्रोल केले, कधी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला, काहीना काही निमित्ताने उर्फीचे नाव लोकांच्या जिभेवर कायम आहे.