पुरुषांनो सावधान..! मोबाईलच्या अतिवापराने तुमच्या ‘या’ गोष्टीवर होतोय थेट परिणाम असंच म्हणावं लागेल कारणही तसंच थक्क करून देणारं आहे. या डिजिटल युगात मोबाईल ने मानवी जीवनात मोठं स्थान मिळवलं आहे.एकमेकांशी संपर्क करणे असो की, फोटो, गाणे, डिजिटल व्यवहार असो की अजून बरंच काही तो फक्त मोबाईल वर करतांना दिसत आहे, परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, ज्या प्रमाणे अँड्रॉइड मोबाईल मुळे अनेक फायदे झाले आहे त्याच प्रमाणे त्याचे मानवी शरीरावर मोठे परिणाम पण झाल्याचे दिसून आले आहे, नुकतेच एका संशोधनातून पुरुषांच्या शुक्राणूवर थेट परिणाम होतं असल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमकं काय परिणाम होतोय…
नुकतेच दक्षिण कोरियाच्या संशोधकांनी ४ हजार २८९ शुक्राणू नमुन्यांच्या १८ रिसर्चचे विश्लेषण केले आहे या संशोधणानंतर तज्ञांनी सल्ला दिला की, मोबाईलममधून बाहेर पडणारे ‘विद्युत चुंबकीय तरंग’ थेट शुक्राणूंना नुकसान पोहोचवतात. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी पुरूषांनी मोबाईलचा वापर कमी करायला हवा.
मोबाईलच्या अतिवापरामुळे वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होत आहेत. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार मोबाईल फोनमुळे पुरूषांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते. मोबाईलच्या अतीवापरामुळे पुरूषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्तेवर परिणाम होत आहे. १८ अभ्यासांवर आधारित हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
हे देखील वाचा….
निरोगी राहण्यासाठी दिवसातून एकदा कॉफी प्या, मिळतात हे आरोग्यादायी फायदे
सोने 900 रुपयांनी तर चांदी 2200 रुपयांनी गडगडली, वाचा जळगाव सुवर्णनगरीतील भाव
10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकऱ्यांची संपूर्ण यादी येथे पहा, बंपर भरती सुरूय
Flipkart वर 50 इंचाचा ‘हा’ स्मार्ट टीव्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा
सध्याच्या काळात मोबाईल हा लोकांच्या जीवनाचा खूप महत्वाचा भाग झाला आहे. मोबाइल बघितला नाही तर अनेकांचा जीव अस्वस्थ होतो. जगभरातील लाखो लोकांना दिवसभर मोबाईलवर काम करत रहावे लागते. लहान मुलांच्या अभ्यासापासून अनेक महत्वाच्या कामांसाठी मोबाईल लागतोच. शिवाय चांगलं नेटवर्क मिळाल्याने लोक आता प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल वापरत आहेत.