जळगाव : आंतरराष्ट्रीय बाजारातील मौल्यवान धातूंच्या किंमतीमधील तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे.दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून स्थिर असलेल्या सोन्या-चांदीच्या भावामध्ये मोठी घसरण झाली आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावात तब्बल 900 रुपयांची घसरण होवून 48 हजार 300 रुपये प्रति तोळा झाला आहे. तर चांदीच्या भावात 2 हजार ते 2200 रुपये घसरण होवून चांदीचा भाव 63 हजार 600 रुपये प्रति किलो इतका झाला आहे.
10 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 48,560 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चादीचे दर 62,030 रुपये असा होता. 12 जानेवारी 2022 रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 48,570 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. तर एक किलो चांदीचे दर 62,090 रुपये इतका नोंदविला गेला.
यापूर्वी 18 जानेवारी रोजी जळगाव सराफ बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49,040 इतका होता. तर चांदीचा प्रति किलोचा भाव 63,350 रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात 4 ते 5 हजारांची वाढ दिसून येते.