हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी याठिकाणी तरुणाच्या डोक्यात दगड घालून तसेच काठीने मारहाण करत त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सचिन धुळबाजी धवसे असं हत्या झालेल्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे एका महिलेसह तिच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.
मृत सचिन हा औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी येथील रहिवासी आहे. 22 जानेवारी रोजी रात्रीपासून तो आपल्या घरातून गायब झाला होता. घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी डिग्रस कऱ्हाळे शिवारातील एका शेतात त्याचा मृतदेह आढळून आला आहे. यावेळी सावळी येथील काही नागरिकांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता, हा मृतदेह सचिनचा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
हे सुद्धा वाचा :
धक्कादायक ! पाचोऱ्यातील अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
तुम्हाला LPG वर सबसिडी मिळतेय की नाही? हे काम आजच करा, खात्यात लगेच पैसे येतील
खोकला, सर्दी किंवा डोकेदुखीचा त्रास होतोय? तर प्या खारट चहा, जाणून घ्या फायदे
परीक्षेशिवाय भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी, 2.18 लाख पगार मिळेल
ही धक्कादायक घटना उघडकीस येताच नागरिकांनी औंढा नागनाथ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच मारेकऱ्याच्या शोधासाठी श्वान पथकाला पाचारण केलं. श्वान पथकाने घटनास्थळापासून अर्धा किमी अंतरापर्यंत मारेकऱ्यांचा माग काढला. पण मारेकरी काही सापडले नाही. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि मृताच्या जवळच्या मित्रांची चौकशी केली.
यावेळी पोलिसांना सचिनच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. यावेळी फरार झालेल्या दोन आरोपींबाबत पोलिसांना माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या आधारे दोन्ही आरोपींना मनमाड रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतलं. हे दोन्ही आरोपी पती पत्नी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या घटनेचा पुढील तपास औंढा नागनाथ पोलीस करत आहेत.