पाचोरा प्रतिनिधी | तालुक्यातील वरसाडे प्र.बो. येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सातारा येथे गेल्या तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या अत्याचारातून अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिला आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून मल्हार पेठ (जि. सातारा) पोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा शून्य क्रमांकाने पाचोरा पोलिस ठाण्यात वर्ग झाला आहे.
हे सुद्धा वाचा :
पुष्पा चित्रपटाच्या श्री वल्ली… गाण्यावर थिरकली सैराट फेम आर्ची ; पहा व्हिडीओ
तुम्हाला LPG वर सबसिडी मिळतेय की नाही? हे काम आजच करा, खात्यात लगेच पैसे येतील
खोकला, सर्दी किंवा डोकेदुखीचा त्रास होतोय? तर प्या खारट चहा, जाणून घ्या फायदे
परीक्षेशिवाय भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी, 2.18 लाख पगार मिळेल
काय आहे घटना?
वरसाडे येथील एक कुटुंब सातारा जिल्ह्यातील कराड येथील साखर कारखान्यात लागणाऱ्या ऊस तोडणीसाठी सन २०१९पासून वास्तव्यास होते. दरम्यान, या कुटुंबातील एका १६ वर्षीय अल्पवयी मुलीचे तिच्या आई-वडिलांनी विवाह लावून दिला होता. संबंधित व्यक्तीपासून तिला २१ जानेवारीला बाळ झाले. हे बाळ नाजुक असल्याने त्यास सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सातारा पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा रुग्णालयात जबाब नोंदवला. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून मल्हार पेठ (सातारा) येथील पोलिस ठाण्यात दीपक शांताराम सोनवणे, कल्पना शांताराम सोनवणे, शांताराम भगवान सोनवणे, शालिक सोनवणे, आई सिंधू भरत भील व वडिल भरत भील (सर्व रा. वरसाडे, ता. पाचोरा) या ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.