मुंबई, (प्रतिनिधी)- मुंबईच्या नौदल डॉकयार्ड येथे असलेल्या आयएनएस रणवीरच्या एका कंपार्टमेंटमध्ये झालेल्या एका स्फोटात तीन नौदल कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्याची घटना दिनांक 18 रोजी घडली,हा स्फोट झाल्यावर, जहाजावरील कर्मचाऱ्यांनी त्वरित आणि तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या. या घटनेत मोठी वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
आयएनएस रणवीर ही युद्धनौका, नोव्हेंबर 2021 पासून, पूर्व नौदल कमांडमधून क्रॉस कोस्ट कार्यवाहीसाठी इथे तैनात होती आणि लवकरच ही नौका आपल्या तळावर परत जाणार होती. या घटनेच्या बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा….
BSNL चा ‘हा’ प्लॅन Jio, Airtel, Vi ला देतोय टक्कर ! कमी किमतीत मिळेल बरेच काही
साऊथ सुपरस्टार धनुषने 18 वर्षांच्या संसारानंतर पत्नी सोबत घेतला घटस्फोट
रेल्वेत या पदांवर परीक्षेशिवाय मिळतील नोकऱ्या, लवकर अर्ज करा