जळगाव । उद्या दि. १२ ला भुसावळ-इगपुरी मेमू गाडीने जर तुम्ही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर लक्ष द्या. उद्या दि १२ जानेवारीला अप-डाऊन वरील भुसावळ-इगपुरी मेमू गाडी रद्द करण्यात आलेली आहे. भादली जळगांव दरम्यान चौथ्या लाईनच्या कामामुळे अप-डाऊन वरील भुसावळ-इगपुरी मेमू गाडी रद्द करण्यात आलेली आहे.
दोन वर्षापासून बंद असलेली भुसावळ-देवळाली शटल एवजी भुसावळ इगतपुरी मेमू गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १० जानेवारीपासून भुसावळ-इगतपुरी (Igatpuri) मेमू (Memu) ट्रेन सुरु झाली आहे. दोन दिवसानंतर उद्या 11119/11120 या क्रमांकाची भुसावळ – इगतपुरी मेमू गाडी रद्द करण्यात आलेली आहे. भादली जळगांव दरम्यान चौथ्या लाईनच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.