जळगाव : जिल्ह्यात आत्महत्या करण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होतानाचे दिसून येत आहे. जळगावातील एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी पहाटे उघडकीस आली आहे. नरेश ऊर्फ बाळा रवींद्र सपकाळे असे मृत तरुणाचे नाव असून आत्महत्या मागील कारण अद्यापही कळू शकले नाही.
याबाबत असे की, शहरातील दिनकर नगरातील मोहन टॉकीज जवळ नरेश सपकाळे हा आपल्या कुटुंबासोबत राहतो. त्याचे स्वतःचे ट्रॅक्टर असून तो त्या ठिकाणीच काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह भागवतो. रात्री नेहमीप्रमाणे जेवण केल्यानंतर घराशेजारी असलेल्या पार्टिशनच्या खोलीत झोपायला गेला होता. सकाळी पाच वाजेच्या सुमारास पत्नी लक्ष्मी यांनी उठून पाहिले असता नरेश याने गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याने आत्महत्या का केली? याबाबत अद्यापही कळू शकले नाही. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.