पुणे: दोन वर्षांच्या चिमुरड्यासह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी समोर आलीय. पुणे-सोलापूर रस्त्यालगत असणाऱ्या म्हातोबाची आळंदी परिसरात हा प्रकार घडला. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कविता देवीदास भोसले (वय ३०, सध्या रा. भेकराईनगर, हडपसर, मूळ रा. उमरगा, जि. उस्मानाबाद) असे मयत महिलेचे नाव आहे. कविता भोसले यांना प्रसन्नराज हा दोन वर्षांचा लहान मुलगा होता. काही वैयक्तिक कारणामुळे कविता भोसले यांनी दोन वर्षांच्या प्रसन्नराजला घेऊन विहिरीत उडी मारली आणि आयुष्य संपवले.
शुक्रवारी संध्याकाळी या दोघांचे मृतदेह विहिरीत तरंगताना दिसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या दोघांच्या मृत्यमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या महिलेच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.