पाचोरा : तालुक्यातील गडद नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेला नेरी येथील २५ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. सचिन भगवान पाटील (वय २५)असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या तरुणाचा शोध सुरू आहे.
याबाबत असे की पाचोरा तालुक्यातील नेरी येथील सचिन पाटील हा तरुण आपल्या दोन मित्रांसह गावालगत असलेल्या गडद नदीत पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान सचिन याने पोहण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र, त्यानतंर तो पाण्याच्या प्रवाहातून बाहेर आलाच नाही. हे पाहून त्याच्यासोबत आलेले दोघे मित्र घाबरले. त्यांनी आरडा-ओरड करुन गावात जाऊन ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानतंर त्याचा शोध घेतला जात आहे.
रात्री उशीरापर्यंत हा तरुण सापडलेला नव्हता. नदी काठच्या गावकऱ्यांना तरुण आढळल्यास पाचोरा पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.