मुंबई : आज सलग चौथ्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रविवारी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट झाल्यानंतर आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. रविवारी देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये 10 ते 15 पैशांपर्यंत पेट्रोल -डिझेलच्या किमतींमध्ये घट करण्यात आली होती.
सध्या जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.५२ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९५.९४ रुपये इतका आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किमती 101.19 रुपये आणि डिझेलच्या किमती 88.62 रुपये प्रति लिटरवर स्थित आहेत. तर मुंबईत पेट्रोलच्या किमती 107.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 96.16 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. घरगुती बाजारात इंधनाच्या किमतींमध्ये आज कोणताही बदल झालेला नसला तरी अद्यापही किमती उच्चांकी पातळीवर आहेत.
सप्टेंबर महिन्यात दोन वेळा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली. महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच, 1 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 15-15 पैसे प्रति लिटरची कपात केली होती. तसेच, 05 सप्टेंबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये 15-15 पैशांची घट झाली होती. म्हणजेच, या आठवडाभरता पेट्रोल-डिझेल 30-30 पैशांनी स्वस्त झाला आहे.