उमंग सामुहिक अर्थवशीर्ष पठण उत्साहात ;उमंग भजनसंध्या व श्री गणेशा चित्रप्रदर्शन
चाळीसगाव – श्री गणेशाच्या जयजयकाराने व पूजनाने शुभ कार्याची सुरुवात करतो भारतीय संस्कृतीत श्री गणेशा आराध्य दैवत मानतात लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात समाजाच्या सर्वांगीण विकास व उन्नतीसाठी झाले आहे समाजातील वाईट प्रवृत्तीना बंद करण्यासाठी सकारात्मक विचार एकत्र झाले पाहिजे स्त्री हि एक शक्तीचे रूप मानतात सर्व स्त्री शक्ती एकत्रित आली तर आदिशक्ती रूप घेते आजच्या काळाची गरज म्हणून सर्व मैत्रीण माझ्या सोबत आहे म्हणून तुमचे सर्वांचे आशीर्वाद घेते
प्रत्येकाला यश सामर्थ्य कीर्ती, समृद्धी व सौख्य लाभण्यासाठी सामुहिक अर्थावशीर्ष पठणाने गणेशाची आराधना करू या आपले जीवनातील विघ्न दूर करू या. लोकमान्य टिळकांनी दिलेला गणेशोस्तवाचा वारसा अधिक समृध्द करू या जपू या
अशी भावना उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील यांनी आज येथे व्यक्त केली.
येथील खासदार उन्मेष पाटील प्रेरित उमंग समाजशिल्पी महीला परिवारात दरवर्षीप्रमाणे दहा वर्षा पासून सुरु असलेला सामुहिक अर्थवशीर्ष पठणाचा व श्री गणेशा चित्रप्रदर्शन कार्यक्रम 7 सप्टेंबर 2019 रोजी भूषण मंगल कार्यालय मध्ये 5 हजार महिलांच्या उपस्थितीत जल्लोषात व आनंदात संपन्न झाले यावेळी त्या बोलत होत्या .
भजनसंध्याचा कार्यक्रम रंगला
भजन संध्या या कार्यक्रमात श्री गणेशाच्या उपस्थितीत श्री गणेशाचा व विविध देवांचा जयजय कार करत आनंद जल्लोषात सर्व भजनी मंडळानी सहभाग नोंदवला प्रथम भजनी मंडळ, विघ्नहर्ता भजनी मंडळ, राणी भजनी मंडळ,वृंदावन भजनी मंडळ, सप्त्सृंगी भजनी मंडळ यांनी सुमधुर भजने म्हटली.उमंग परिवाराच्या संस्थापिका संपदाताई पाटील यांनी अभंगाचा ठेका धरत जल्लोषात भजन म्हंटले भजनी मंडळातील सर्व महिलामा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच कार्यकारी मंडळाच्या सदस्य माधुरी वाघ, कविता पाटील,प्रतिभा पाटील,आराध्य माळतकर,साधना पाटील, रेखा जोशी,उज्वला अमृतकार,जयोती पाटील,ललिता पिंगळे,माधवी पाटील,रत्नप्रभा नेरकर,सारिका जैन,महानंदा पद्वलकर, विजया पाटील, दामिनी वाघ उमंग सृष्टी स्कूल च्या विजया भोकरे, नीलिमा पाटील, नेहा पाटील,पल्लवी दीक्षित यांच्यासह अर्जुन पाटील, सुहास पाटील, फैय्याज शेख सर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक पुतळ्याजवळ श्री गणेशाच्या आगमन काळात विविध भजनी मंडळ सहभागी झाले. उमंग परिवाराच्या संस्थापिका संपदा पाटील यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. उमंग परिवाराच्या अध्यक्षा सुवर्णा राजपूत व उमंग कार्यकारी मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या.
गणेशाच्या चित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद..
उमंग परिवार म्हणजे स्त्री शक्तीची जनजागृती, आत्मविश्वास,आनंद स्त्री सक्षमीकरण या उद्देशाने कार्यरत आहे. या परिवाराच्या दूर दृष्टीतून श्री गणेशा चित्र प्रदर्शनात श्री गणेशाचे विविध रूपाचे चित्र अमोल येवले, तेजल बानकर, प्रियांका मालपुरे, वर्षा बंक्षी यांनी आपल्या सुप्त केलेतून सुंदर व मनाला मोह पडतील अश्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.