मुंबई: सलग ३१ दिवस दर स्थिर राहिल्यानंतर डिझेलच्या भावात किंचित का होईना पण घसरण सुरु झाली आहे. आज गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी डिझेल 20 पैशांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोलचे दर मात्र सलग 33 व्या दिवशीही स्थिर आहेत. आज पेट्रोल दर जैसे थे आहे . परंतु, डिझेलच्या दरात अशीच घसरण सुरु राहिल्यास पेट्रोलचे दरही खाली येतील, असा अंदाज बांधला जात आहे.
तब्बल चार महिन्यांनंतर काल बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेल दरात कपात केली. काल डिझेलच्या किमतींमध्ये 20 पैशांची घट करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या 33 दिवसांपासून पेट्रोलच्या किमतीत कोणताच बदल करण्यात आलेला नाही.
दरम्यान, जळगावात आजचा एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९८ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९६.६६ रुपये इतका झाला आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलची किंमत 107.83 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 97.04 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोलसाठी 101.84 तर एका लीटर डिझेलसाठी 89.47 रुपये मोजावे लागत आहेत.
दररोज 6 वाजता बदलतात किमती
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.