एअर इंडिया लिमिटेडनं जारी केलेल्या माहितीनुसार एकूण 30 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज दाखल करण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरी तारीख जवळ आल्यानं उमेदवारांनी तातडीनं अर्ज दाखल करण आवश्यक आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर वेबसाईटवरुन लिंक हटवली जाणार आहे.
या पदांवर भरती
१) बीपीओ टीम लीडर – 1 पद
२) व्यवस्थापक (व्यापार विक्री) – 1 पद
३) अधिकारी/ AM विक्री (विक्री समर्थन आणि बाजार विश्लेषक) – 1 पद
४) अधिकारी/ AM (ग्राहक तक्रार) -1 पद
५) सहाय्यक व्यवस्थापक / उपव्यवस्थापक / व्यवस्थापक – 5 पदे
६) स्टेशन मॅनेजर (उर्वरित भारत) – 14 पदे
७) AGM (IOCC) – 1 पद
८) आयटी हेड – 1 पद
९) एजीएम (वैद्यकीय सेवा) – 1 पद
१०) वरिष्ठ पर्यवेक्षक (वैद्यकीय) – 1 पद
११) ग्राउंड इंस्ट्रक्टर (तांत्रिक/कामगिरी) – 3 पदे
शैक्षणिक पात्रता :
बीपीओ टीम लीडर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला कॉल सेंटरमध्ये दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा. त्याचबरोबर आयटी प्रमुख पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक किंवा MCA पदवी असणे आवश्यक आहे. एजीएम (वैद्यकीय सेवा) पदासाठी, उमेदवाराकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करायचा?
एअर इंडियामधील रिक्त पदांवर अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करावा. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरील अधिसूचनेसह दिलेला अर्ज डाउनलोड करावा लागेल. अर्जातील माहिती भरून अलायन्स एअर, कार्मिक विभाग, अलायन्स भवन, डोमेस्टिक टर्मिनल -1, आयजीआय विमानतळ, नवी दिल्ली-110037 वर स्पीड पोस्टाद्वारे पाठवणं आवश्यक असेल.
निवड प्रक्रिया
मुलाखत प्रक्रियेद्वारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी एअर इंडियाकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय.