भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. या तरुणांना रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वेत फिटर, वेल्डर, विंडर, मशीनिस्ट, कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, मेकॅनिक आणि वायरमनच्या ट्रेड्सवर शिकाऊ उमेदवारांसाठी मोठी संधी आहे.
एकूण १६६४ रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र असलेले उमेदवार १ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांची भरती प्रयागराज, झाशी आणि आग्रा विभागात केली जाईल. उमेदवारांना अधिकृत अधिसूचनेत अर्ज, निवड आणि भरतीशी संबंधित संपूर्ण माहिती मिळू शकते
पात्रता : अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यालयातून किमान ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वेल्डर, वायरमन आणि कारपेंटर ट्रेडसाठी ८ वी पास उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे, तर आरक्षित प्रवर्ग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे. उमेदवारांची निवड गुणवत्तेनुसार केली जाईल.
वयाची अट : १ सप्टेंबर २०२१ रोजी १५ ते २४ वर्षे.
मानधन : निवड लेल्या उमेदवारांना 18,000 रुपये ते 56,900 रुपये वेतन णीवर नियुक्त केले जाईल.
रेलवे रिक्रूटमेंट सेलच्या (RRC) अधिकृत rrcpryj.org वेबसाइटवर सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया २ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. रेल्वेतील शिकाऊ उमेदवार ०१ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. लेव्हल १ पदांच्या थेट भरतीत २०% रिक्त जागांवरही उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
भरतीबाबतची जाहिरात पाहण्यासाठी : PDF