नजरचुकीने’ केलेली व्याजदर कपातीची ‘चूक’ सुधारली पण इंधन दरवाढीची ‘घोडचूक’ कधी सुधारणार असा सवाल काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित करून केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे.
अल्पबचतीच्या व्याजदरावर घट करीत 1974 नंतर पहिल्यांदाच व्याजदर 7 टक्केच्या खाली आणून काल आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सर्वसामान्यांना झटका दिला होता मात्र आज सकाळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढावत
नजरचुकीने’ केलेली व्याजदर कपातीची ‘चूक’ सुधारली पण इंधन दरवाढीची ‘घोडचूक’ कधी सुधारणार असा सवाल उपस्थित करून केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे.