अॅक्सिस बँकेत विविध २४६३ पदे भरण्याबात अधिसूचना जारी केली असून यात ग्राहक सेवा अधिकारी, शाखा ऑपरेशन्स हेड, बिझिनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, एचआर मॅनेजर, प्रॉडक्ट stनालिस्ट, आरएम, बिझिनेस मॅनेजर, सेल्स मॅनेजर, ब्रांच हेड, बिझिनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह व इतर पदांच्या अर्ज मागविण्यात येत आहे.
दरम्यान अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२१ रोजी आहे.
ग्राहक सेवा अधिकारी, शाखा परिचालन प्रमुख, व्यवसाय विकास कार्यकारी, एचआर व्यवस्थापक, उत्पादन विश्लेषक, आरएम, व्यवसाय व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, शाखा प्रमुख, व्यवसाय विकास कार्यकारी व इतर पोस्टची एकूण संख्याः २४६३ इतकी आहे.
याकरिता अर्जदारांनी मान्यताप्राप्त संस्था / मंडळाकडून पदवी आणि पीजी उत्तीर्ण केलेले पाहिजे तर अर्ज करतांना उमेदवारांचे वय किमान वय १८ वर्षे ते २७ पर्यंत असणे आवश्यक आहे. यावेळी निवड प्रक्रिया ही मुलाखतीनुसार केली जाईल.
अर्ज करण्यासाठी
सर्वप्रथम axisbank.com वर अधिकृत वेबसाइट भेट द्या
करिअर विभागात क्लिक करा.
अर्ज भरा,यासाठी लागणारी अर्ज फी भरा,अंतिम सबमिशनसाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
भविष्यातील वापरासाठी प्रिंट आउट जतन करा आणि आपल्या अर्जाची प्रिंट घ्या.















