जळगाव, (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा
शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात रुग्ण व नातेवाईकांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.नातेवाईकांना अडचण असल्यास या नंबरवर संपर्क करू शकणार आहे.
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल रुग्णांच्या प्रकृतीची माहिती नातेवाईकांना मिळावी त्यासाठी जिल्हा प्रशासनाने 8767199476 हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.
रुग्णालयातील बेड्स ची माहिती देण्यासाठी, बेड्स उपलब्ध करुन देण्यासाठी बेड्स व्यवस्थापन समिती नेमण्यात आली असून या माहिती करिता 9356944314 यावर संपर्क करण्याचे अवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.















