रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष बाबासाहेबांचा पक्ष असून या पक्षात बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो माजी मुख्यमंत्री बहन मायावती या जर ‘रिपाई’ आल्यास त्यांना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष बनवू असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज ट्विट करुन सांगितलं आहे.
रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी काही वेळा पूर्वीच आपल्या ट्विटर हॅण्डल वरून ट्विट करून म्हटलं आहे की,रिपब्लिकन पक्ष हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे.त्यामुळे जे लोक स्वतःला आंबेडकरवादी मानतात त्यांनी रिपाइंत आले पाहिजे.माजी मुख्यमंत्री मायावती यांनी आणि भीमआर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी रिपाइंत यावे. बहन मायावती या आरपीआय मध्ये आल्यास त्यांना रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष करू. यावर सोशल मीडिया मधून सर्व नेत्यांनी एकत्र येत राष्ट्रीय आघाडी करुन नवा पर्याय द्यावा अशी मागणी होतं आहे.