Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ.उल्हास पाटील नॉनकोविड रुग्णालयात २००च्या वर रुग्णांवर उपचार सुरु

सामान्य रुग्णालयातील रुग्णांसाठी पुढेही योजनेत होणार मोफत उपचार

najarkaid live by najarkaid live
December 18, 2020
in जळगाव
0
डॉ.उल्हास पाटील नॉनकोविड रुग्णालयात २००च्या वर रुग्णांवर उपचार सुरु
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – शासन अधिग्रहित डॉ.उल्हास पाटील नॉन कोविड रुग्णालयात सामान्य रुग्णालयातील २०० च्यावर रेफर रुग्णांवर अद्यापही मोफत उपचार सुरु असून यापुढेही महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना मोफत उपचार सुरु राहणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणून डॉ.उल्हास पाटील नॉन कोविड रुग्णालयाचे ३५० बेड शासनाने अधिग्रहित केलेले होते. आजपावेतो या रुग्णांवर मोफत उपचार सुरु होते. परंतु आता जिल्हा सामान्य रुग्णालय स्थलांतर झालेले असले तरी अनेक रुग्ण डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. त्यांची परवड होवू नये म्हणून अशा रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचाराची सुविधा दिली जात असून रुग्ण सममाधानी असल्याचे चित्र दिसून येते. गेल्या सहा महिन्यात डॉ.उल्हास पाटील नॉन कोविड रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांनी येथील सेवेचे कौतुक करत आपल्या भागातील रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात पाठविले. जिल्ह्यातील जनतेसाठी आधारस्तंभ ठरलेल्या या रुग्णालयात आजही उपचार घेण्याचा कल रुग्णांमध्ये दिसून येत आहे. येथील एकाच छताखाली उपलब्ध सेवा सुविधा आणि त्यामुळे उपचारात मिळणारा दिलासा रुग्णांना प्रभावित करुन गेला. आजही अनेक रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयाऐवजी डॉ.उल्हास पाटील नॉन कोविड रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. अशा रुग्णांची परवड न होवू देता त्या रुग्णांना योजनेंतर्गत मोफत उपचार करुन देत असल्याने आजही दोनशेच्यावर रुग्ण उपचार घेत आहेत. यापुढेही जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांसाठी मोफत उपचारासाठी सुविधा योजनेंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.उल्हास पाटील रुग्णालय प्रशासनाने केले आहे. जनसेवेची संधी मिळाल्यावर रूग्णांचे समाधान झाल्याचा आनंद — डॉ उल्हास पाटील शासनाने जून महिन्यात डॉ.उल्हास पाटील रुग्णालय हे जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणून अधिग्रहित केले होते त्याचबरोबर रुग्णालयातील विस्तारित भाग पाहता कोविड रुग्णालय म्हणून देखील अधिग्रहित केले होते. यामुळे कोविडसह अन्य सर्वसामान्य रुग्णांची सेवेची संधी मिळाली. कोविडकाळातही रुग्णांवर उपचार करत त्यांना दिलासा दिला, यामुळे रुग्ण देखील आजारातून मुक्त होत आनंदाने घरी जात,रूग्णांच्या चेह—यावरचे समाधान ही आमच्या कामाची पावती असून माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांनी आनंद व्यक्त केला आमच्या रुग्णालयातून आता जिल्हा सामान्य रुग्णालयाचे स्थलांतर झाले असले तरी यापुढेही रुग्णांना योजनेंतर्गत मोफत उपचार देत असून त्याचा लाभ घ्यावा असेही आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘ अमर रहे’ च्या जयघोषात सीमा सुरक्षा दलाच्या जवान अमित पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next Post

शेतीच्या ७/१२ उत्ताऱ्यावर लावलेल्या पत्नीच्या नावाला काढलेली हरकत नोटीस रद्द साठी घेतली लाच

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण

शेतीच्या ७/१२ उत्ताऱ्यावर लावलेल्या पत्नीच्या नावाला काढलेली हरकत नोटीस रद्द साठी घेतली लाच

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us