जळगाव, (प्रतिनिधी) – गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या विधान परिषदेच्या बारा जागांची यादी आज महा विकास आघाडी च्या नेत्यांनी राज्यपालांकडे दिली आहे. यात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचं नाव निश्चित झाला असल्याचं सूत्रांकडून समजते. याबाबत एकनाथ खडसे यांनी खुद्द याबाबत दुजोरा दिला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेसाठी नाव जाहीर केल्याने मी त्याचे स्वागत करतो असं खडसेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागेल याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. अखेर आज परिषदेच्या बारा आमदारांच्या यादीमध्ये राष्ट्रवादीकडून एकनाथराव खडसे यांचे नाव पाठवण्यात आलं आहे.
















